प्रति. माननीय मुख्यमंत्री,मंत्रालय, मुंबई . माननीय. उपमुख्यमंत्री(गृह),मंत्रालय,मुंबई.

प्रति.  माननीय मुख्यमंत्री,मंत्रालय, मुंबई          .   माननीय. उपमुख्यमंत्री(गृह),मंत्रालय,मुंबई.       दिनांक-१६/११/२०२३.प्रति.माननीय मुख्यमंत्री,मंत्रालय, मुंबई.   ...

प्रति.  माननीय मुख्यमंत्री,मंत्रालय, मुंबई          .   माननीय. उपमुख्यमंत्री(गृह),मंत्रालय,मुंबई.       दिनांक-१६/११/२०२३.

प्रति.

माननीय मुख्यमंत्री,मंत्रालय, मुंबई.     माननीय उपमुख्यमंत्री(गृह),मंत्रालय,मुंबई.        माननीय मुख्यसचिव,मंत्रालय,मुंबई.       माननीय अपर मुख्य सचिव(गृह),मंत्रालय,मुंबई.     माननीय पोलीस महासंचालक,राज्य पोलीस मुख्यालय,मुंबई.        माननीय पोलीस महासंचालक,लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,वरळी,मुंबई.          माननीय पोलीस आयुक्त,मुंबई पोलीस आयुक्तालय,मुंबई.

माननीय सह पोलीस आयुक्त(गुन्हे),मुंबई पोलीस आयुक्तालय,मुंबई.          सप्रेम नमस्कार,               विषय/- वनराई पोलिस ठाणे मध्ये दिनांक १४/११/२०२३ रोजी गुन्हा नोंद ३९७/२०२३,कलम ४२०,४६४,४६५,४६७,४७१ अंतर्गत तपासामधील सांशकता निर्माण झाली आहे.धनौली इंफ्रा प्रोजेक्ट कंपनी चा ट्रेलर GJ12BX2783 मधील पाच टन स्टील रॉड्स स्टिल चोर बक्कल खान यांनी चोरले आणि मूळ वजन बेल्टी चलनातील वजनाप्रमाणे त्याने त्याच्या मालकीच्या वजनकाट्यावर सदरची गाडी नेवून कॉम्पुटर चिफ च्या माध्यमातून रिमोटद्वारे बनावट वजन असलेली पावती बनवली आहे.याबाबत अनेक टीव्हीट आणि युट्यूब चॅनल वरील न्यूज,लिखित तक्रारी मुंबई पोलिसां केलेल्या आहेत.सदर प्रकरणातील वरिष्ठ व स्थानिक पोलीस अधिकारी ,बक्कल खान ,कंपनीच्या साईटवरील सुपरवायझर, वजनकाट्यावरील वजन करणारा बक्कल खानचा कामगार,ट्रेलर मधील डायव्हर - किनर ,चोरीच्या अड्ड्यावरील बक्कल खान चे कामगार अर्थात चोर ,पोलिसात सेटिंग करणारा दलाल यांचे सीडीआर, एसडीआर, डीयुएम, मोबाईल टॉवर लोकेशन आणि लाखों रुपयांची लाचेचा व्यवहार भ्रष्ट अधिकाऱ्यानी केला असल्याची सखोल चौकशी मुंबई सह पोलीस आयुक्त गुन्हे यांच्या माध्यमातून करण्यात येणेबाबत.                                       महोदय,

आपणास कायदा-सुव्यवस्थेचा हितार्थ निवेदन देण्यात येत आहे की,मुंबई पोलीस आयुक्तालय अंतर्गत येणाऱ्या पोलीस ठाणे मधील दखलपात्र गुन्ह्याची प्रेस नोट मुंबई पोलीस वेबसाईट वर २४ तासात प्रसिद्ध करण्यात येते.मग वनराई पोलीस ठाणे मध्ये दिनांक १४ /११/२०२३ रोजी गुन्हा नोंद करण्यात आला आहे तो प्रसिद्धी का केला नाही? वनराई पोलिस व काही वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी मूळ गंभीर गुन्ह्याला शिथिल करुन मूळ स्टील माफिया व त्याच्या मालकीच्या वजन काट्यावर सेटिंग करणारा अब्दुल हमीद जमीरउल्लाहा खान उर्फ बक्कल खान आणि त्याच्या टोळीला वगण्यात आले त्याबद्दल मोठ्याप्रमाणात आर्थिक लाचखोरी झाली आहे काय? मूळ हकिगत खालीलप्रमाणे अशी आहे की,-

दिनांक ११-१२/११/१०२३ रोजी वापी वरुन पालघर जिल्ह्यातील मनोर स्थित हालोली येथील स्टील चोर बक्कल खान व त्याचे साथीदाराने डायव्हरच्या संगनमताने धनौली इंफ्रा प्रोजेक्ट यांचे ट्रेलर GJ12BX2783 ट्रेलर मधून पाच टन स्टील रॉड्सची चोरी करुन मूळ बेल्टी चलनातील तूट भरून काढण्यासाठी स्टील माफिया बक्कल खान याने त्याच्या मालकीच्या वजनकाटा मधील कॉम्पुटर चिफ द्वारे रिमोट कंट्रोल च्या माध्यमातून पाच टन स्टील ची तूट भरून बनावट वजनाची पावती डायव्हर ला दिली होती.पाच टन कमी असलेला मालासहित ट्रेलर धनौली इंफ्रा प्रोजेक्ट कंपनीच्या प्रोजेक्ट साईटवर माल उतरविण्याच्या आत अनेक सामाजिक व पत्रकाराने पोलिसांना माहिती देवून पोलिसांच्या माध्यमातून ट्रेलर पकडण्यात आला होता.सदरचे ट्रेलर त्याच साईटवर पोलिसांच्या निगराणीत असताना स्टील माफिया व वजनकाटा सेटींग करणारा सराईत गुन्हेगार बक्कल खान याने दिनांक १३/११/२०२३ च्या उशिरा रात्री कंपनीचे साईटवरील सुपरवायझरला हाताशी घेवून त्यांच्या टोळीद्वारे पाच टन कमी असलेल्या ट्रेलर मधील पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने त्यामध्ये दुसऱ्या वाहनातून स्टील रॉड्स चा माल लोडिंग करीत असताना पोलिसांनी तिघांना रंगेहात पकडले होते.अनेक गंभीर गुन्हे दाखल असलेला बक्कल खान याच्यावर काही महिन्यापूर्वी तडीपारी कारवाई मुंबई पोलिसांनी केली होती.त्याने तडीपारी कारवाई पैश्यांच्या जोरावर रद्दबातल केली होती.स्टील चोर बक्कल खान,असलम खान,कलिमचिकना,अल्ताफ चौधरी,सैफ खान,इरफान खान,इम्तियाज खान,पवन मिश्रा,बबलू खान आदी गुन्हेगारांची टोळी स्टील रॉड्स ची चोरी व त्यांच्या मालकीच्या वजनकाट्यावर कॉम्पुटर चिफ माध्यमातून रिमोट   च्या सहाय्याने ट्रेलर मधील पाच-पाच टन स्टिल रॉड्स चा माल कमी असताना वजन मुळ वजनाप्रमाणे बनावट पावती बनवून अनेक कंपनीला कोट्यावधी रुपयांना तोट्यात घालून संबंधित चोरांची टोळी केंद्र व राज्य सरकारला कोणताही टॅक्स न भरता स्वतः अब्जाधीश होत आहेत.

आपला नम्र/-

नाव/- नियाज अहमद खान [ मुख्य संपादक: सुभाना टाइम्स ]           मोबाईल नंबर/- 9987280988       पत्ता/- रुम नम्बर 53 ओमकार रागा बिल्डिंग जवल चेंम्बुर मुंबई 400071

रिपोर्टर

संबंधित पोस्ट